• fullslide6

सर्व ज्ञातीबांधव सभासद देणगीदार आधारस्तंभ लाभार्थी हितचिंतक यांना नमस्कार व २०२२ च्या शुभेच्छा!!!

यावर्षी KPL २०२२ होणार की नाही? झाले तर कधी होणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गेल्या वर्षी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री. उदय सामंत साहेब यांनी केलेल्या घोषणेनुसार ७ व्या क्रीडा महोत्सव (KPL २०२२) चे आयोजन, नियोजन दापोली येथे ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जिल्हा रत्नागिरी’ च्या भव्य संकुल आणि मैदानात होणार आहे.याचा आनंद लुटण्यासाठी आपणास पूर्वनोंदणी करणे गरजेचे आहे.

७ क्रीडा महोत्सव दिनांक २९, ३० एप्रिल आणि १ मे २०२२ असे तीन दिवस खेळविण्यात येईल. मात्र उद्घाटन सोहळा २९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता असल्याने सर्व टीम खेळाडू व पदाधिकाऱ्यांची निवासी व रात्रीची भोजन व्यवस्था २८ एप्रिल पासूनच सुरु केली आहे

सातव्या क्रीडा महोत्सवाच्या सर्व सूचना, नियम, अटी व नोंदणी प्रक्रिया यांची माहिती या पेजवर प्रकाशित करीत आहोत. क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि कॅरम असे पाच प्रकारचे खेळ खेळले जातील. त्यातील कोणत्याही फक्त २ प्रकारच्याच खेळात खेळाडू सहभागी होऊ शकतो.तिसऱ्या खेळासाठी निष्फळ प्रयत्न करू नये, ही विनंती.

क्रीडामहोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी या वेबपेजवर रजिस्ट्रेशन लिंक उपलब्ध आहेत. नोंदणी सहज आणि सुरळीत करता यावी यासाठी इच्छुकांनी नोंदणी करण्यापूर्वी नोंदणीबाबत आवश्यक सूचना नीट वाचावी, ही विनंती.


अधिक माहितीसाठी नोंदणी प्रक्रियेतील समस्या तसेच मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा.

मनीष दाभोलकर : ९८२१२५८०४७ (9821258047)
उमाकांत महाजन : ९६८९७८१७५० (9689781750)
अनिकेत वालावलकर : ९८६७२९४२७२ (9867294272)

Email: kplkdagb@gmail.com