सभेचे वार्षिक स्नेह-संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा

सभेचे दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरणारे वार्षिक स्नेह-संमेलन हे सभासदांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक आनंद मेळावाच असतो. गेली तीन वर्षे आयोजित केलेल्या वार्षिक स्नेह-संमेलनाचा तपशील खालीलप्रमाणे-

गौड ब्राह्मण सभा - १२२ वे वार्षिक स्नेह-संमेलन (२०१९)
स्व. श्री. गुं. फ. आजगावकर जन्मशताब्दीनिमित्त (२०१९) गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा :

गौड ब्राह्मण सभेचे १२२वे वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिराच्या सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या वार्षिकोत्सवाचे आणखी एक खास वैशिट्य म्हणजे आपल्या ज्ञातीतील एक बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, साहित्यिक, कवी, इतिहाससंशोधक, निर्भीड पत्रकार, शिक्षक स्व. श्री. गुं. फ. आजगावकर यांच्या जन्मशताब्दीचे (२०१९) औचित्य साधून गौड ब्राह्मण सभा व आजगावकर कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने, गौड ब्राह्मण त्रैमासिकाच्या ‘स्व. श्री. गुं. फ. आजगावकर गौरवग्रंथा’चे प्रकाशन, वेबसाईट तसेच ‘गुं. फ.’च्या कारकीर्दीवर आधारित रंगीत माहितीपटाचे प्रसारण ज्ञातीतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून आदरणीय डॉ. महेश केळुसकर (कवी, ज्येष्ठ साहित्यिक) उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ज्ञातीतील उद्योजक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री. राजाभाऊ पाटकर होते. विशेष अतिथी म्हणून स्व. श्री. गुं. फ. आजगांवकरांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय श्री. संतोष आजगावकर (ज्ञातीतील एक ज्येष्ठ उद्योजक) उपस्थित होते. या निमित्ताने ज्ञातीतील महनीय व्यक्तींचा, त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सभेचे पदाधिकारी, ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र-संचालन विरारच्या सौ. अंजली श्याम सामंत यांनी केले.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →

गौड ब्राह्मण सभा - १२१ वे वार्षिक स्नेह-संमेलन (२०१८)

गौड ब्राह्मण सभेचे १२१ वे वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. २५ डिसेंबर २०१८ रोजी गोरेगाव (प.) येथील पाटकर महाविद्यालयाच्या सभागृहात ज्ञातीतील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मेजर अरविंद रामचंद्र पाटील (निवृत्त मेजर, भारतीय भूदल) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीरचक्र विजेते आदरणीय कॅ. मोहन नारायण सामंत (निवृत्त कॅप्टन, भारतीय नौदल) यांच्या हस्ते ज्ञातीतील महनीय व्यक्तींचा, त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह बहाल करून यथोचित सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला सभेचे पदाधिकारी, विविध ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र-संचालन विरारच्या सौ. अंजली श्याम सामंत यांनी केले.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →

गौड ब्राह्मण सभा - १२० वे वार्षिक स्नेह-संमेलन (२०१७)

सभेचे १२० वे वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दि. २५ डिसेंबर २०१७ रोजी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिराच्या दत्त मंदिर सभागृहामध्ये मोठ्या उत्साहाने व दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री. अश्विन मोहन सामंत (प्रथितयश उद्योगपती) तसेच कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय C.A. रमेश प्रभू यांच्या हस्ते ज्ञातीतील महनीय व्यक्तींचा त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान-सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला सभेचे पदाधिकारी, विविध ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद आवर्जून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →

“गौड ब्राह्मण” त्रैमासिक अमृतमहोत्सव सोहळा
गौड ब्राह्मण सभा - ११७ वे वार्षिक स्नेहसंमेलन (२०१४)

सन २०१४ हे सभेच्या “गौड ब्राह्मण” या मुखपत्राचे अमृत महोत्सवी वर्ष होते. हे औचित्य साधून शनिवार २७ डिसेंबर २०१४ रोजी संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि मुखपत्राचा अमृत महोत्सवी सोहळा आदरणीय सर्वश्री किरण ठाकूर, शशी प्रभू, गुरु ठाकूर, व्ही. जी. सामंत, डॉ. जगदीश सामंत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंत नाट्यमंदिराच्या भव्य सभागृहात पार पडला. या निमित्ताने गौड ब्राह्मण” त्रैमासिकाच्या अमृतमहोत्सवी देखण्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचा उगम आणि त्याचा इतिहास, “गौड ब्राह्मण सभा” या ज्ञातीसंस्थेचे सामाजिक कार्य तसेच “गौड ब्राह्मण” त्रैमासिकाची अमृतमहोत्सवी वाटचाल या बाबतची सखोल माहिती करून देणारी “दिव्यत्वाची जेथ प्रचिती” ह्या गौड ब्राह्मण सभा निर्मित माहितीपटाचे प्रसारण यशवंत नाट्यमंदिरात करण्यात आले. तसेच ज्ञातीबांधवांसाठी विविध विषयांवर लेखन स्पर्धा आणि मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे, नचिकेत देसाई, गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील या कलाकारांचा “स्वर अमृताचे गीत गौरवाचे” हा सुरेल संगीताचा आणि नाट्यगीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर करण्यात आला.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून सभेचे माजी विश्वस्त स्व. श्री. एकनाथ केशव ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ज्ञातीतील कर्करोगग्रस्तांसाठी एक कोटीचा “स्व. श्री. एकनाथ केशव ठाकूर कर्करोग वैद्यकीय उपचार फंड” उभारण्याचे सभेच्यावतीने जाहीर करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →