• fullslide6
    Kayam Nidhi
    We rise by lifting others

कायमनिधी

सभेच्यावतीने ज्ञातिबांधवांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवादालनांचा तपशील खालीलप्रमाणे -

१. शैक्षणिक पारितोषिक फंड

ज्ञातीतील दानशूर व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभेच्या विविध पारितोषिक फंडांच्या व्याजातून दरवर्षी माध्यमिक शालान्त (S.S.C.) प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक शालान्त (H.S.C.) प्रमाणपत्र परीक्षा तसेच अन्य परीक्षांमध्ये विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या ज्ञातीतील हुशार व होतकरू मुला/मुलींना संस्थेतर्फे पारितोषिक व प्रशस्तीपत्रे देऊन विशेष कार्यक्रमात गौरवण्यात येते.

गुणगौरव अर्ज पाहण्यासाठी येथे click करा. →

२. गौड ब्राह्मण त्रैमासिक प्रकाशन फंड

“गौड ब्राह्मण’ हे त्रैमासिक ज्ञातीचे मुखपत्र आहे. या त्रैमासिकाला ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत, हे नमूद करायला आम्हाला विशेष आनंद होत आहे. सदर त्रैमासिकाच्या माध्यमातून ज्ञातीमध्ये होणाऱ्या बदलांचा, तरुण पिढीच्या नव्या विचार प्रणालीचा तसेच इतर घडामोडींचा परामर्ष घेतला जातो. शिवाय ज्ञातीबांधवांना संघटित करून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. गौड ब्राह्मण सभेतर्फे प्रकाशित केले जाणारे हे त्रैमासिक संस्थेचे परंपरेने चालत आलेले वैभव आहे.
या त्रैमासिकाचे वर्षातून चार विशेषांक प्रकाशित केले जातात. ज्ञातीतील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या भरगोस देणग्यांच्या व्याजातून छपाईचा खर्च केला जातो. सभेच्या आजीव सभासदांना सदर त्रैमासिक टपालाद्वारे विनामूल्य घरपोच पाठवले जाते.
संस्थेच्या या उपक्रमासाठी ज्ञातीतील दानशूरांनी सढळ हस्ते देणग्या द्याव्या ही विनंती.

३. सामुदायिक मौजीबंधन फंड

प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये ज्ञातीतील बटूंसाठी सभेतर्फे नाममात्र नोंदणीशुल्क आकारून सामुदायिक मौजीबंधन सोहळा आयोजित केला जातो. संपूर्ण तपशीलासाठी कृपया सायं. ४.०० ते ८.०० या वेळेत सभेच्या कार्यालयात संपर्क साधावा. या उपक्रमासाठी ज्ञातीबांधवांकडून भरघोस देणग्या अपेक्षित आहेत.

४. स्व. श्रीमती लक्ष्मीबाई दिनकर खानोलकर व स्व. श्री. दिनकर खानोलकर सभागृह कोष

आपल्या ज्ञातीतील एक दानशूर महिला स्व. लक्ष्मीबाई दिनकर खानोलकर (गोरेगाव) यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे गोरेगाव पूर्व येथील नीलाश्री सोसायटीतील आपली सदनिका गौड ब्राह्मण सभेला दान केली आहे. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गौड ब्राह्मण सभेने त्यांच्या व त्यांच्या पतीच्या स्मृतीप्रीत्यर्थ “स्व. श्रीमती लक्ष्मीबाई दिनकर खानोलकर व स्व. श्री. दिनकर खानोलकर सभागृह कोष” फंडाची स्थापना केली असून भविष्यात या फंडाच्या रकमेतून भव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. जागा, जमीनजुमला, निवासी घर दान करणारे, किंवा रु. ५,००,०००/- व त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या दात्यांचे फोटो व त्यांची नावे सभागृहात लावण्यात येतील तसेच रु. १,००,०००/- व त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या दात्यांची नावेदेखील सभागृहात लावण्यात येतील. या सर्व दानशूरांची नावे गौड ब्राह्मण त्रैमासिकात कायम स्वरूपी छापण्यात येतील. ज्ञातीतील दानशूरांनी संस्थेच्या या प्रकल्पाला सढळ हस्ते देणग्या द्याव्यात ही विनंती.

५. वधू-वर पालक मेळावा

सभेतर्फे ज्ञातीतील वधू-वरांसाठी वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात ‘वधू-वर पालक मेळावा’ आयोजित करून मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जाते. ज्ञातीतील वधू—वरांची माहिती सभेच्या गौड ब्राह्मण त्रैमासिकात प्रकाशित केली जाते. वधू-वर नोंदणीसाठी वार्षिक शुल्क रु.२५०/- (नोंदणी केलेल्या तारखेपासून फक्त एक वर्षाकरिता) आकारले जाते वधू-वर नोंदणी अर्ज सभेच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयात उपलब्ध आहेत. आपल्या विनंतीनुसार अर्ज टपालाद्वारेदेखील पाठविले जातात.
(मात्र यासाठी सभेचे आजीव सभासदत्व स्वीकारणे बंधनकारक नाही. आपण र.२५०/- शुल्क भरून वधू-वर नोंदणी करू शकता.)
दर शनिवारी सायं. ४ ते ६ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात अर्जदारांना वधू-वरांची माहिती पुरविली जाते.

६. गौड ब्राह्मण सभा वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा

वार्षिक स्नेह-संमेलनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, औद्योगिक, क्रीडा आदि क्षेत्रांत कार्य करणाऱ्या ज्ञातीतील कर्तबगार, निपुण अशा मान्यवर व्यक्तींचा सभेतर्फे सत्कार, सन्मान केला जातो.

७.रुग्णसेवा

ज्ञातीतील तसेच अन्य समाजातील रुग्ण व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी परत करण्याच्या बोलीवर सभेतर्फे विविध वैद्यकीय उपकरणे विनामूल्य पुरवली जातात. गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
सन २०१८-१९ मध्ये बहुसंख्य गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला. वरील सर्व उद्दिष्टांना हातभार लावण्यासाठी दानशूरांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी.

८. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमिअर लीग क्रीडामहोत्सव कायमनिधी फंड

दरवर्षी गौड ब्राह्मण सभा व इतर ज्ञातीसंस्थांच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी सभेने कायमनिधी फंडाची स्थापना केली असून या फंडाच्या रकमेच्या व्याजातून क्रीडामहोत्सवाच्या आयोजनावर खर्च केला जाणार आहे. ज्ञातीतील दानशूरांनी या कायमनिधी फंडासाठी भरघोस देणग्या द्याव्यात, ही विनंती.

९. स्व. श्री. डी. जी. तेंडोलकर तथा दिनानाथ गोपाळ तेंडोलकर स्मृती व्याख्यानमाला फंड

आपल्या ज्ञातीतील एक दानशूर व्यक्ती स्व. रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये गिरगावातील “टोपीवाला ज्ञानमंडळा”च्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेचे औचित्य साधून आपल्या ज्ञातीतील एक सुप्रसिद्ध पत्रकार, चरित्रकार स्व. श्री. डी. जी. उर्फ दिनानाथ गोपाळ तेंडोलकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्याकरिता दरवर्षी सदर व्याख्यानमालेतील शुभारंभाचे व्याख्यान गौड ब्राह्मण सभेतर्फे पुरस्कृत केले जाते. व्याख्यानाच्या सुरुवातीस गौड ब्राह्मण सभा व टोपीवाला ज्ञानमंडळाच्यावतीने मान्यवर व्याख्यात्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह बहाल करून यथोचित सन्मान करण्यात येतो. तसेच सदर व्याख्यान पुरस्कृत करण्यासाठी गौडब्राह्मण सभेला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल टोपीवाल ज्ञानमंडळाचे संस्थेच्यावतीने विशेष आभार मानण्यात येते.
सदर व्याख्यानमालेत गौड ब्राह्मण सभेने मागील तीन वर्षे पुरस्कृत केलेल्या व्याख्यानांचा तपशील खालीलप्रमाणे-

सन २०२०
व्याख्यानाचा विषय :“हसू आणि आसू”
व्याख्याते :प्रा. सचिन देवरे (पाचोरे)

सन २०१९
व्याख्यानाचा विषय :“मुंबई मेट्रो – ३ समजून घेताना”
व्याख्यात्या :श्रीम. अश्विनी भिडे, IAS (मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालिका)

सन २०१८
व्याख्यानाचा विषय :“पसायदान”
व्याख्यात्या :सौ. धनश्री लेले (निवेदिका, लेखिका)

वरील सर्व उद्दिष्टांना हातभार लावण्यासाठी दानशूर ज्ञातीबांधवांकडून सढळ हस्ते आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा.

Secretary: Mr. Subhash Wagh
Working Chairman: Mr. Umakant Mahajan Phone: +91 9689781750
Treasurer: Mr. Manish Dabholkar Phone: +91 9821258047