सभेचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारी मंडळ:

सभेच्या घटनेतील तरतुदीनुसार प्रचलित निवडणूक पद्धतीद्वारे सभेचे विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे निवडले जाते.

विश्वस्त:

संस्थेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी तीन विश्वस्त नेमण्यात येतात. विश्वस्तांची निवड सभेच्या वार्षिक साधारण सभेत करण्यात येते. सदर निवडलेल्या विश्वस्तांची मुदत तीन वर्षे असते. दरवर्षी एक विश्वस्त निवृत्त होतात. निवृत्त झालेले विश्वस्त फेरनिवडणुकीस पात्र असतात.

अध्यक्ष व उपाध्यक्ष:

एक अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्ष यांची निवड दर तीन वर्षांनी सभेच्या वार्षिक साधारण सभेत करण्यात येते.

कार्यकारी मंडळ

सभेच्या कार्यकारी मंडळावर एकूण १२ सदस्य असतात. या १२ सदस्यांमधून दर वर्षी एक तृतीयांश सभासद म्हणजे ४ सदस्य निवृत्त होत असतात. निवडणुकीद्वारे सभेच्या वार्षिक साधारण सभेत त्यांच्या जागी तितकेच सदस्य निवडले जातात. निवृत्त झालेले सदस्य पुन्हा निवडून येण्यास पात्र असतात.
कार्यकारी मंडळाच्या एकूण १२ सदस्यांमधून कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी म्हणून एक कार्याध्यक्ष, दोन चिटणीस आणि एक खजिनदार कार्यकारी मंडळाच्या सभेत निवडले जातात.
१२२ वर्षांचा गौरवशाली कार्यकाल पूर्ण केलेली गौड ब्राह्मण सभा, गिरगाव येथे मूळ ठिकाणी आजही दिमाखात उभी आहे. सभेचे विद्यमान विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच कार्यकारी मंडळाचे विद्यमान पदाधिकारी आणि सदस्य आपल्या पूर्वसूरींनी दाखवलेल्या समाजोन्नतीच्या मार्गावर ठामपणे व विचारपूर्वक वाटचाल करीत आहेत.
सभेची ध्येयं आणि उद्दिष्टांची अधिक व्यापक प्रमाणावर पूर्तता करणे, “गौड ब्राह्मण” त्रैमासिकाचे स्वरूप अधिक कल्पक आणि आधुनिक बनवणे, विविध आर्थिक मदत निधींची मर्यादा वाढवणे, तसेच निरनिराळ्या कल्पक योजना आणि उपक्रम याद्वारे ज्ञातीच्या गौरवशाली परंपरेची प्रगत वर्तमान पिढीशी नाळ जोडणे आदि जबाबदारीची कामे सभेचे हे विद्यमान विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारी मंडळ करीत आहे.

संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ (सन २०१९-२०) पाहण्यासाठी येथे click करा. →