• fullslide6
    Social Aid (सामाजिक स्तरावर आर्थिक साहाय्य)
    Kindness is a gift that everybody can afford to give

Story behind

ज्ञातीतील दानशूरांनी सभेला दिलेल्या भरगोस देणग्यांमधून, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गौड ब्राह्मण सभेने काही कायमनिधी फंड गठीत केले असून या कायमनिधी फंडांच्या व्याजातून तसेच ज्ञातीतील निराधार, निराश्रित, गरीब, गरजू स्त्री/पुरुष यांस आर्थिक मदत दिली जाते तसेच गरीब व गरजू मुलींच्या विवाहाप्रीत्यर्थ आर्थिक मदत दिली जाते.

मुंबईतील विलेपार्ले येथील ज्ञातीतील दानशूर महिला स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील तसेच स्व. श्री. विष्णू मंगेश पाटील यांनी आपल्या इच्छापत्रानुसार सभेला दिलेल्या भरघोस देणगीतून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायमनिधी फंड गठीत केला असून सदर देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील निराश्रित महिला गरजूंना पुढील फंडातून आर्थिक मदत दिली जाते.
१. स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित महिला साहाय्यकारी कोष : (ज्ञातीतील निराधार, गरीब, निराश्रित महिला तसेच ज्ञातीतील ७० वर्षेवरील वयोवृद्ध महिलांना आर्थिक साहाय्य) एकूण कायमनिधी देणगी रु. २०,१२,०००/-
सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. २,६१,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

पनवेल येथील आपल्या ज्ञातीतील एक दानशूर व्यक्ती श्री. अरविंद लक्ष्मण पाटील पाटकर यांनी आपल्या मातोश्रींच्या तसेच वडिलांच्या स्मरणार्थ सभेला दिलेल्या देणगीतून, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायामनिधी फंड गठीत केला असून सदर देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील गरजू निराश्रित स्त्री/पुरुषांना त्या त्या फंडातून आर्थिक मदत दिली जाते. याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे -
१. स्व. लक्ष्मण अनंत पाटील पाटकर कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित महिला/पुरुष साहाय्यकारी कोष : (ज्ञातीतील निराधार, गरीब, गरजू/निराश्रित महिला/पुरुषांना आर्थिक साहाय्य) एकूण कायमनिधी देणगी रु. २,५०,०००/-
सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. २०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

ज्ञातीतील दानशूरांनी संस्थेच्या कन्यादान फंडासाठी आतापर्यंत दिलेल्या रु. ५,७४,९२१/- इतक्या देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील गरीब, गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाहाप्रीत्यर्थ संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली जाते. २०१८-१९ साली मध्ये ज्ञातीतील मुलींच्या विवाहाप्रीत्यर्थ सदर फंडाच्या व्याजातून रु. ४०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली.

Forms for Download

कन्यादान फंड
Download Here →
स्व. लक्ष्मण अनंत पाटील पाटकर कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित महिला_पुरुष साहाय्यकारी कोष
Download Here →
स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित महिला साहाय्यकारी कोष
Download Here →
स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण मतीमंद साहाय्य कोष
Download Here →