• fullslide6
    Medical Financial Aid (वैद्यकीय आर्थिक मदत)
    Caring cause ripple effect… cause change

Story behind

ज्ञातीतील दानशूरांनी सभेला दिलेल्या भरगोस देणग्यांमधून, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गौड ब्राह्मण सभेने काही कायमनिधी फंड गठीत केले असून या कायमनिधी फंडांच्या व्याजातून तसेच ज्ञातीतील कर्करोग, हृदयविकार, किडणीविकार, मतिमंद, अपंग आदि व्याधीग्रस्त रुग्णांना औषधोपचार/शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते.
याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे


मुंबईतील विलेपार्ले येथील ज्ञातीतील दानशूर महिला स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील तसेच स्व. श्री. विष्णू मंगेश पाटील यांनी आपल्या इच्छापत्रानुसार सभेला दिलेल्या भरघोस देणगीतून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायमनिधी फंड गठीत केला असून सदर देणगी रकमेच्या व्याजातून ज्ञातीतील गरजू रुग्णांना पुढील फंडातून आर्थिक मदत दिली जाते.
१. स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण रुग्णसेवा कोष (ज्ञातीतील रुग्णांना विशेषत: स्त्री रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक साहाय्य)
एकूण कायमनिधी देणगी रु. २०,१२,०००/- सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. १,८०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

सहकार महर्षी, अर्थतज्ज्ञ, माजी खासदार, सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष, गौड ब्राह्मण सभेचे माजी विश्वस्त स्व. श्री. एकनाथ केशव ठाकूर ह्यांच्या स्मरणार्थ गौड ब्राह्मण सभेच्यावतीने “स्व. एकनाथ केशव ठाकूर स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण कर्करोग वैद्यकीय उपचार फंड” या नावाने कायमनिधी फंड उभारण्यात आला असून या फंडात रु. १,००,००,०००/- चे उद्दिष्ट गाठण्याचा संस्थेचा मानस आहे. ज्ञातीतील दानशूरांनी या फंडाला दिलेल्या देणग्यांच्या व्याजातून ज्ञातीतील गरीब, गरजू कर्करोगग्रस्त रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. याबाबतचा तपशील खालील प्रमाणे -
१. स्व. एकनाथ केशव ठाकूर स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण कर्करोग वैद्यकीय उपचार फंड (ज्ञातीतील निराश्रित, निराधार, गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक साहाय्य)
एकूण निधी संकलन (३१ मार्च २०१९ पर्यंत) रु. ३६,८१,५६९/- सन २०१८-१९ साली सदर फंडाच्या व्याजातून रु. १,६०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

ज्ञातीतील दानशूर व्यक्तींनी संस्थेच्या वृद्धाश्रम फंडाकरिता आतापर्यंत दिलेल्या रु. २,९२,६९१/- इतक्या देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील रुग्णांना तसेच ज्ञातीतील ७० वर्षांवरील निराश्रित, निराधार, गरीब, गरजू, आजारी वयोवृद्धांना वर्षातून एकदा सदर फंडातून आर्थिक मदत दिली जाते. छापील अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयात उपलब्ध आहेत. विनंतीनुसार अर्ज टपालाद्वारेदेखील पाठविले जातात.
सन २०१८-१९ साली सदर फंडातून ज्ञातीतील वयोवृद्धांना औषधोपचारासाठी रु. १६,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

ज्ञातीतील दानशूर व्यक्तींनी संस्थेच्या वैद्यकीय फंडाकरिता दिलेल्या रु. १२,६०,८०७/- इतक्या देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील निराश्रित, निराधार, गरीब, गरजू रुग्ण व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.
सन २०१८-१९ साली ज्ञातीतील गरजू रुग्णांना सदर फंडातून रु. ८०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

मुंबईतील विलेपार्ले येथील ज्ञातीतील दानशूर महिला स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील तसेच स्व. श्री. विष्णू मंगेश पाटील यांनी आपल्या इच्छापत्रानुसार सभेला दिलेल्या भरघोस देणगीतून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायमनिधी फंड गठीत केला असून सदर देणगीच्या व्याजातून ज्ञातीतील गरजूंना आर्थिक मदत दिली जाते. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे -
स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण मतिमंद साहाय्य कोष (ज्ञातीतील मतिमंदांना विशेषत: मतीमंद मुली / स्त्रियांना औषधोपचारासाठी आर्थिक साहाय्य) एकूण कायमनिधी देणगी रु. २०,१२,०००/- सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. ८०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

Forms for Download

वृद्धाश्रम फंड (वैद्यकीय साहाय्यासाठी)
Download Here →
वैद्यकीय फंड
Download Here →
स्व. एकनाथ केशव ठाकूर स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण कर्करोग वैद्यकीय उपचार फंड
Download Here →
स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण रुग्णसेवा कोष
Download Here →