• fullslide6
    Educational Aid
    Be the light that helps others see

Story behind

ज्ञातीतील दानशूरांनी सभेला दिलेल्या भरगोस देणग्यांमधून, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गौड ब्राह्मण सभेने काही कायमनिधी फंड गठीत केले असून या कायमनिधी फंडांच्या व्याजातून गरजू व होतकरू विद्यार्थी/विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते.
संस्थेच्या विविध कायमनिधी फंडाचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

मुंबईतील विलेपार्ले येथील ज्ञातीतील दानशूर महिला स्व. श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील तसेच स्व. श्री. विष्णू मंगेश पाटील यांनी आपल्या इच्छापत्रानुसार सभेला दिलेल्या भरघोस देणग्यांतून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायमनिधी फंड गठीत केले असून सदर देणग्यांच्या रकमेच्या व्याजातून ज्ञातीतील होतकरू, गरजू, गरीब मुला/मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
१. स्व. लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण महिला विद्यार्थी/विद्यार्थिनी विद्यावृद्धी कोष : (ज्ञातीतील होतकरू, गरजू, गरीब मुला/मुलींना शिष्यवृत्ती)
एकूण कायमनिधी देणगी रु. २०,१२,०००/- सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. १,६६,०००/- इतक्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
२. स्व. श्रीमती गौरी आणि स्व. श्री मंगेश पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी विद्यावृद्धी कोष शहर व ग्रामीण भागातील ज्ञातीतील होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
एकूण कायमनिधी देणगी रु. २,५०,०००/- सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. २५,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
३. स्व. श्रीमती लीला आणि स्व. श्री. दामोदर सामंत स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी विद्यावृद्धी कोष शहर व ग्रामीण भागातील ज्ञातीतील होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
एकूण कायमनिधी देणगी रु. २,५०,०००/- सन २०१८-१९साली सदर कोषातून रु. २०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

पनवेल येथील आपल्या ज्ञातीतील एक दानशूर व्यक्ती श्री. अरविंद लक्ष्मण पाटील पाटकर यांनी आपल्या मातोश्रींच्या तसेच वडिलांच्या स्मरणार्थ सभेला दिलेल्या देणगीतून, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सभेने खालील कायमनिधी फंड गठीत केला असून सदर देणगी रकमेच्या व्याजातून ज्ञातीतील गरजू मुलामुलींना त्या त्या फंडातून शिष्यवृत्ती दिली जाते.
स्व. अन्नपूर्णा लक्ष्मण पाटील पाटकर कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी/विद्यार्थिनी विद्यावृद्धी कोष ज्ञातीतील होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थी/विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती
एकूण कायमनिधी देणगी रु. २,५०,०००/- सन २०१८-१९ साली सदर कोषातून रु. २०,०००/- इतक्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

Forms for Download

कै. लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण महिला विद्यार्थी विद्यावृद्धी कोष
Download Here →
स्व. अन्नपूर्णा लक्ष्मण पाटील पाटकर कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी_विद्यार्थिनी विद्यावृद्धी कोष
Download Here →
स्व. श्रीमती गौरी आणि स्व. श्री मंगेश पाटील स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी विद्यावृद्धी कोष
Download Here →
स्व. श्रीमती लीला आणि स्व. श्री. दामोदर सामंत स्म. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण विद्यार्थी विद्यावृद्धी कोष
Download Here →
बोनाफाइड व मार्कशिट फॉर्म
Download Here →