वधू-वर मेळावा (Matrimony)

संस्थेचे आजीव सभासद, माजी पदाधिकारी श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेला ‘वधू–वर पालक मेळावा’ आजही प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यात संस्थेतर्फे आयोजित केला जातो. सदर कार्यक्रमाला वधू-वर, पालक, त्यांचे नातेवाईक, ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अन्य ज्ञातीबांधव आवर्जून उपस्थित राहतात. वधू-वरांकडून प्राप्त झालेल्या तपशीलास गौड ब्राह्मण त्रैमासिकातून प्रसिद्धी दिली जाते. वधू-वर नाव नोंदणीसाठी तसेच वधू-वर सूचीकरिता सभेच्या कार्यालयात संपर्क साधावा.
अहवालसाली संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून संस्थेचा ‘वधू-वर पालक मेळावा’ बुधवार दि. २५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. विलास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शारदाश्रम विद्यामंदिराच्या दत्तमंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
अहवालसाली ज्ञातीतील वधू-वरांनी आपल्या नावांची संस्थेकडे रीतसर नोंदणी केली. त्याद्वारे संस्थेला देणगीरूपाने रु. ३३,२५०/- इतक्या रकमेचे नोंदणी शुल्क संस्थेला प्राप्त झाले. सदर मेळाव्याला ज्ञातीतील वधू-वर, त्यांचे पालक, नातेवाईक, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

नोंदणीकरिता येथे clik करा. →

वधू वर सूचीकरिता येथे clik करा. →

अधिक माहितीसाठी येथे click करा. →