दुर्मीळ ग्रंथ संग्रह

गौड ब्राह्मण ज्ञातीचा शेकडो वर्षांचा इतिहास पाहता वेळोवेळी यासंदर्भात लेखन, चित्रण झाल्याचे दिसून येते. ही ग्रंथसंपदा आपल्या वैभवशाली आणि स्फूर्तिदायक परंपरेची साक्ष देते. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा वारसा, अमूल्य ठेवा सांभाळणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. गौड ब्राह्मण सभेने अशा मौल्यवान ग्रंथ संपदेचे जतन आणि संवर्धन करून तो ज्ञातिबांधवांसाठी उपलब्ध करण्याचा निश्चय केला आहे.




दुर्मीळ साहित्य संग्रह फंड:

गौड ब्राह्मण ज्ञातीविषयक साहित्य, त्याबाबतचा इतिहास, दुर्मीळ ग्रंथ, फोटो, ध्वनिफीत (Audio), चित्रफीत (Video) इत्यादींचे जतन व संवर्धन करून त्याबाबतची माहिती गौड ब्राह्मण त्रैमासिकाच्या माध्यमातून ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्मीळ साहित्याचा अमोल ठेवा ज्ञातीबांधवांकडे पडून असल्यास तो गौड ब्राह्मण सभेकडे सुपूर्त करावा. त्याचे संस्थेतर्फे योग्य जतन व संवर्धन केले जाईल.
या उपक्रमासाठी अर्थातच आर्थिक साहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सभेने “दुर्मीळ साहित्य संग्रह फंडा” ची स्थापना केली आहे. या फंडाच्या व्याजातून या प्रकल्पावर खर्च केला जाणार आहे. ज्ञातीतील दानशूरांनी यासाठी सढळ हस्ते आर्थिक साहाय्य करण्यासाठी आम्ही विशेष आवाहन करीत आहोत.
अहवालसाली श्रीमती भावना सामंत (गोरेगाव) यांनी मराठी साहित्यातील विविध विषयांवरील दुर्मीळ ग्रंथ संस्थेला भेटीदाखल दिले आहेत. आम्ही संस्थेच्यावतीने त्यांचे आभारी आहोत.