सामुदायिक उपनयन संस्कार – २०१८

गौड ब्राह्मण सभा, प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये ज्ञातीतील बटूंसाठी नाममात्र नोंदणी शुल्क आकारून मौजीबंधनाचा सोहळा गिरगाव येथे आयोजित करीत असते. सदर सोहळा रविवार दिनांक ६ मे २०१८ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत गिरगाव येथील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निवासातील टोपीवाला वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. दाभोली मठातून पौरोहित्याचे शिक्षण घेतलेल्या श्री. सुरेंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमंत्रांच्या घोषात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञातीतील ५ बटूंवर विधिवत उपनयन संस्कार करण्यात आले.
या मौजीबंधनाच्या सोहळ्यास बटूंचे नातेवाईक, सभेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, ज्ञातीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →