नमस्कार!

www.gaudbrahmansabha.org या संकेतस्थळावर सर्व आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांचे खूप खूप विनम्र स्वागत! गौड ब्राह्मण सभेला १२२ वर्षांची महान वैभवशाली परंपरा लाभली आहे. ‘कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांची सर्वांगीण उन्नती आणि विकास’ हे मुख्य उद्दिष्ट मानून सभेची अखंड वाटचाल चालू आहे. सभेची विविध ध्येयं-धोरणे, उपक्रम याबाबत सभेच्यावतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या “गौड ब्राह्मण” या मुखपत्रामधून याची साक्ष मिळते. हे संकेतस्थळ म्हणजे सभेने नव्या-जुन्या विचारांची सांगड घालून आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये ठेवलेले हे पुढचे पाऊल आहे. माहितीच्या महाजालात स्वत:चे असे विशेष स्थान निर्माण करणे, आपल्या पूर्वजांनी दिलेले विचार आणि संस्कार नव्या पिढीपर्यंत डोळसपणे पोहोचवणे; तसेच कामानिमित्त आपला देश, आपले मूळ गाव सोडून दूरवर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या ज्ञातिबांधवांना एकत्र आणणे, त्याद्वारे माहिती आणि संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी आपुलकीचे व पारदर्शी व्यासपीठ मिळवून देणे व त्यानुसार विकास साधणे ही या संकेतस्थळामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत. आपण नियमितपणे या संकेतस्थळास दिलेली भेट व त्यासंदर्भात आपल्या मौलिक प्रतिक्रिया सभेला तिच्या निश्चित ध्येयपूर्तीच्या वाटचालीसाठी स्फूर्तिदायक आणि मार्गदर्शक ठरतील हे निश्चित!
चला तर मग, सभेच्या या संकेतस्थळाद्वारे “गौड ब्राह्मण ज्ञाती” आणि “गौड ब्राह्मण सभा” याविषयी जाणून घेऊया.

धन्यवाद !!!

गौड ब्राह्मण सभा

ध्येयं आणि उद्दिष्टे:

संस्थेच्या घटना व नियमावलीनुसार संस्थेची ध्येयं आणि उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
(संदर्भ: गौड ब्राह्मण सभेची घटना व नियमावली)

उन्नती:

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीची सर्वांगीण उन्नती करणे.

समाज ऐक्य:

गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांत बंधुत्व, एकता व विश्वास निर्माण करणे.

उत्तेजन:

सभा, स्नेह-संमेलने भरविणे, ज्ञातीतील वधू-वरांसाठी वधू-वर मेळावा, क्रीडामहोत्सव आदि उपक्रम आयोजित करून ज्ञातीबांधवांचा उत्कर्ष साधणे. तसेच ज्ञातीतील ७० वर्षांवरील गरीब स्त्री/पुरुषांना, निराधार, निराश्रित, गरीब, गरजू स्त्री/पुरुषांना, ज्ञातीतील कर्करोगग्रस्तांना तसेच इतर व्याधीग्रस्त रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक साहाय्य करणे, तसेच ज्ञातीतील हुशार, होतकरू, निराधार, निराश्रित, गरीब मुलांना शिष्यवृत्ती (आर्थिक साहाय्य) देणे.

प्रसार:

नियतकालिक प्रकाशित करणे, वाचनालय चालविणे, गौड ब्राह्मण ज्ञातीविषयक दुर्मीळ ग्रंथांचे जतन करणे व याद्वारे ज्ञातीबांधवांना ज्ञातीसंबंधी माहिती पुरवणे.


ठळक घडामोडी:

विचारधन

सेवादालने

माहितीपट